मी पहिल्यांदा मुंबईत आले ते लग्न झाल्यावरच . इथल्या हवेचा , पावसाळ्याचा , गर्दीचा थोडक्यात काय मुंबईचाच चुकूनही संबंध न आलेली मी पुणेकर ! ! इथे आल्यावर आता जाणवतंय खरंच काय काय झेलावे लागत या मुंबईकरांना!!
पुण्यात एक तास जॉगिंग केल्यावर जसा घाम येतो इथे फक्त डोक्यावरचा फॅन बंद करायचा अवकाश आणि धारा बरसायला सुरुवात !! पुणेकर हैराण !! अमितचे (माझा नवरा ) आई बाबा आले आणि घामाघूम होत त्यांना कधी एकदा पुण्याला धूम ठोकतो असं झालं!
दादांना (अमितचे बाबा ) तर चक्क साक्षात्कार झाल्याप्रमाणे म्हणाले, "मला आता कळालं ही मुंबईतली माणसं अशी वेड्यासारखी उघडीवाघडी का फिरतात !! आता मी काही त्यांना नावं नाही ठेवणार !! " मी उगीचच खुश झाले !! वाटलं मला काही माझ्या कपड्यांचं स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही !! तशी मी त्यांची लाडकी सून आहे !! देश तसा वेष हे तंत्र मला अगदी चांगलं जोपासलं आहे !! मग काय !!! गावाकडे गेल्यावर अगदी पूर्ण पोशाख, चुडीदार , साडी , बांगड्या, टिकल्या , मंगळसूत्र , जोडव्यांपासून ते पायांच्या नखांनाही ठरवूंन नख पॉलिश असे सगळे सोपस्कार अगदी सफाईनं करते !!
सांगायचं मुद्दा हा की घामामुळे सगळे हैराण झाले माझ्या ताईनं फॅनखाली पसरण्याची एकही संधी सोडली नाही. आमच्या भाचीबाईंनी पण फॅनखालच्या बैठकीवरचं लोळण काही सोडले नाही !!
to be continued

No comments:
Post a Comment