सारे क्षण आठवले
सार्या आठवणी जाग्या
जरी दूर आता दोघे
पाश तरी ना तुटले
म्हण ही प्रतारणा
बोल जिव्हारी लागला
शब्द मिळेना बोलण्या
तरी क्षमेची याचना
कुठे खोल रूतलेला
श्वास अजूनही ओला
जाते जाते म्हणताना
दाराशी थांबलेला
जन्म जरी हा चुकला
अन् वेळही चुकली
वाट पाहीन मी पुन्हा
तुझ्या माझ्या परतीची
No comments:
Post a Comment