का वाट बघु तुझी,
अंधारलेली रात्र,
थांबलीये तुझ्यासाठी.
का वाट बघु मी तुझी,
आखुडलेले हात,
तू नाही मिठीत घेण्यासाठी.
का वाट बघु तुझी,
दारावर पडलेली थाप,
तू नाही दार उघडू कुणासाठी.
का वाट बघु मी तुझी ,
गंधाळलेला धूप,
तू नाही मोहून जाण्यासाठी.
का वाट बघु तुझी,
दुमडलेलं पान,
तू नाही कविता ऐकण्याठी.
1 comment:
Nice:)
Post a Comment