Sunday, August 5, 2012

तरी सुटेना आस

काय वेळ सांग देवा
चुकले माझे काय
मुले-नातवंडे माझ्या
नाही आसपास

झाली मुले कोडगी की
माझी मायाच थोडकी
आज मरणाच्या वेळी
साथ मला पोरकी

भले मिळाले मला
मोठमोठे पुरस्कार
दोन्ही डोळा भरूनी
पाहीले कौतुक अपार

आयुष्यभराची कमाई
वाया का गेली
कशी कुणाला ना
माझी उणीव भासली

करतो मी जरी
देखभाल स्वतःची
मोठी दिमाख
कणखरपणाची

मन मानेना हार
मन मानेना हार
कणखरपणाची
मोठी दिमाख

आयुष्याच्या शेवटी
तरी सुटेना आस
पुन्हा नव्याने जगणे
नवा अट्टाहास

3 comments:

Sameer Barve said...

एकदम झकास. त्यादिवशी रात्री तुझं फोनवरचं बोलणं ऐकून मला समजत होतं की "त्या" व्यक्तीची मन:स्थिती कशी असेल...आणि ही कविता त्या मन:स्थितीचं अचूक वर्णन करते. अशाच छानछान कविता लिहून सर्वांची शाबासकी मिळव.यश तुझंच असेल.

pranjali said...

आभारी शम्मा.. तिला पण सांगितला आहे या कवितेविषयी..तिला ऐकवल्यावर तिची प्रतिक्रिया काय होतेय ते बघू..

Kedar Potdar said...

Nice post! Keep it up!

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...