ही कविता लिहून एक वर्ष झालं ७ जानेवारी २०११ मधे माझ्या डायरीत उतरवली. आज ब्लॉगवर लिहिली.
आभासांचे जगणे सारे,
सोडून द्यावे म्हणतो.
सतत कुणाची वाट पहाणे,
सोडून द्यावे म्हणतो.
पिढीजात चालल्या चालीरिती,
सोडून द्यावे म्हणतो.
पितरांचे मोक्षबंधही,
तोडून द्यावे म्हणतो
अत्रुपपतपणा अन् अशांतताही,
सोडून द्यावी म्हणतो.
सतत कुणाची वाट पहाणे,
सोडून द्यावे म्हणतो.
मी न भगिरथ
मी न कृष्णही
मला न माहीत
घोर तपोव्रत
चुकणे, घडणे
जगणे, मरणे
ज्याचे त्याला क्रमप्राप्त,
व्यक्तिगत
माझ्यापुरते माझे जग
मीच सावरावे म्हणतो
1 comment:
class...
Post a Comment