Wednesday, September 7, 2011

गोंगाट

किती छान आहे ना
एका गावात एक गणपती
जास्त आवाज नाही
की गोंगाट नाही

एका गावात एक गणपती
जर पूजा करणारा
कुणी एक वर्ग झाला तर
एकाची सत्ता एकाचा अधिकार

गोंगाट होईल आवाज वाढेल
पण एकाधिकार नसेल
सगळे साजरा करतील सण
प्रत्येकाला हव तसा !

देवावर का कुणा
एकाचा अधिकार
नको रे बाबा
त्यापेक्षा गोंगाट बरा !

No comments:

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...