Saturday, August 6, 2011

ओंजळ

मी म्हणाले,
"काय करू मी?"
तू म्हणालास,
"छान आहेत फुलं !
माळ ती केसात."

मला मात्र
ठेवायच होतं
त्यांना ओंजळीत!
वार्‍यावर उडून जाणं
मला पसंत नव्हतं.

देव्हार्‍यात ठेवणं
अतिरेकी होतं.
ओंजळीत मात्र
आश्वासन होतं,
दोन्ही हाती जपण्याचं!

No comments:

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...