Saturday, May 31, 2025

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय,

तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं,

अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास,

तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून 

 सगळ जग पाहावं हाच माझा आनंद होता.


वाऱ्याबरोबर हिंदोळे घेताना 

मातीपर्यंत जाऊन अलगद तिला चुंबावं,

तप्त ऊन्हात तुझ्याबरोबर सर्वांग भाजत

 पावसाची वाट बघावी,

मग तू फांद्यापानातून खुलावं,

मी बी होऊन तुझ्या सावलीत रुजावं.


माझं सगळं जग, जगणं तुझ्याबरोबर होतं

मिरवित होते मी आपलं एक असणं

आज कुणीतरी सहज खुडून गज-यात ओवलं,

त्याच्या प्रेमाची आणि तिच्या केसांची शोभा वाढायला


पिटू

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...