Friday, April 7, 2017

पहाट भूल


माझेच डोळे होते ते,
कुणाला निरखून पाहणारे,
कुणाच असण जवळुन अनुभवणारे,
माझेच डोळे होते भारवलेले,
चिमणचेटुक झालेल्या नजरेने,
त्या प्रत्येकात शुक्र पाहणारे,
आता हीच वेळ आहे, कायमची,
माझ्या अढळताऱ्याला  भुलण्याची,
माझ्या डोळ्यातील जादू नव्याने पाहण्याची
स्वप्न नाही सत्यात उतरवण्याची.

Wednesday, March 29, 2017

रविगीत-पृथ्वीगीत

ग्रीष्मात तप्तते काया तव,
तप्त तव दर्शने मीही पृथ्वी प्रिये.
शिशिर गळतीतुन कुरवाळिता तुज,
पर्णस्पर्शे लहरते तू उमलते.
श्रावणात गे विरह संपता,सरीवर सर,
आवेगाला कसा आवरु,मिलनी तव दंग.
उसासे घेता, सर ओसारता ,
अवतरती तव देही, दवबिंदु शरदातुनि.
शांतवता तू अपादमस्तक, हिमसुमने करी तुजवर पखरण.
तृप्त देही तुजसमीप मी,दो ध्रुवी करी कणकण उजळण.


पृथ्वी गीत

तेजोघ  प्रीतीचा मजवरी बरसतो,
षट ऋतूंचे सोहळे भरवतो,
गिरकत गिरकत लचकत मुरडत,
मीही प्रदक्षिते सावित्री व्रत,
विरहीणी नऊ नवथर,
तव प्रिया मी अवखळ,
दग्ध तू अन् दग्ध मी ,
आकन्ठ प्राशितो प्रेमरस.

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...