Thursday, March 10, 2016

चारोळी- तू नी मी



तू नी मी  चारोळी  अजून सुचली नाही पण तू नि मी चा एक मजेदार अनुभव सांगते . ११ जानेवारीला आमच्या  engagement ची वर्षपूूर्ती झाली.  त्या  वेळी मी  मुंबईत नुकतीच आले होते .  आमचा काही प्लान नव्हता ठरला celebration  चा  . पण सकाळी उठल्यावर आमच्या अहोंच्या मनात आला आपण walk  ला जाऊया national पार्क ला . पण त्या दिवशी जरा जास्तच गार होतं बाहेर . त्यामुळे मी कंटाळा केला .
          मग आमच्या साहेबांनी    beach  वर  जायचं ठरवलं .  आम्ही रिक्षाने गोराई च्या जेट्टी जवळ पोहोचलो . छान सूर्योदय बघितला आणि जेट्टीतून खाडी पार करून गेलो . जेट्टी तून बाहेर पडल्यावर बाहेर खूपच गार होतं . आम्ही रिक्षाने गोराई बंदराकडे निघालो . काय सुंदर रस्ता होता तो  . मुंबईतल्या भाऊ-गर्दीपासून एवढया जवळच इतका हिरवागार परिसर बघायला मिळेल अस वाटलंच नाही . २० मिनिटं आम्ही धुक्यात  होतो आणि त्या  धुक्याच्या धुंदीत . आणि सोबतीला अंगावर काटे  आणणारा  गारवा .  आमचे साहेब नकळत मला बिलगून बसले . एकदम सगळं romantic झालं , जणू आम्ही पुन्हा एकदा गोव्याच्या दीवार बेटावर  आहोत असं मला वाटलं . अगदी तसाच रस्ता . पुनश्च honeymoon डोळ्यात दाटून आला . कदाचित तो आठवावा म्हणून तर साहेबांनी इकडे आणलं असेल असही वाटून गेलं .  आणि आम्ही गोराई गावाजवळ उतरलो.
         तेवढ्यात  माझ्या पोटातल्या कावळ्यांनी हाक दिली.  beach  किती लांब हे माहीत नव्हतं . म्हणून आमच्या अहोंनी चहावर  आणि मी चहा - सामोस्यावर हात साफ केला . आणि आम्ही  beach    साठी प्रस्थान केलं .
      हातात हात घेऊन आम्ही चालत होतो एकदम lonely रस्ता होता . आजूबाजूला  सुंदरसे बंगले होते.  त्या बंगल्याभोवती  खूप  झाडं , नारळीच्या बागा होत्या .  सकाळ च्या  कोवळ्या उन्हात नारळाच्या रांगांमधून निसटून आमच्यावर पडणारं ऊन आम्हाला आणखी वेगळ्या दुनियेत घेऊन जात होतं , आम्ही हातात हात  घेऊन चालत होतो .
      थोडं  पुढे गेल्यावर आम्हाला एक हाकाटी ऐकू आली.  २ मुलं   म्हणत होती , "३०० ला तास ३०० ला तास ..आमच्या कडे या ...आमच्या कडे या" .  मला काही कळलंच  नाही, म्हणजे खरं तर मला शब्दच कळले नाहीत . आणखी दहा पावलं चालत गेल्यावर पुन्हा  एक हाकाटी "ताई इकडे या इकडे या ३०० रुपयात मस्त मजा करा एकदम चांगला पलंग आहे आमच्याकडे .  " आणि आता मात्र मी न राहून याला विचारला "अरे हे लोक काय बोलत आहेत  कशासाठी बोलावत आहेत "  मग आमच्या साहेबांनी सांगितला "अगं  इथे खूप जोडपी येतात, ज्यांना एकांत हवा असतो . हे लोक त्यांना तो देतात . तासावर पैसे मोजून  इथे विकत घेता येतो इथे  हवा तसा एकांत ."
  मी एकदम  उडालेच  !!! आपण कुठे आलो आहोत साहेब !!! काय प्लान आहे तुमचा !!! नुकत्याच बघितलेल्या तमाशा  चित्रपटातलं   वाक्य आठवलं … " इतने पैसेमे  इतनाहीच  मिलेगा साहेब और कुछ करनेका  मैं ज्यादा पैसा लेंगी !!! " आणि  अगदी लागलीच मी  त्याला हे म्हटलं  पण … " क्या  साहेब  मुझे एक घंटे के लिये लेके आये हो क्या  anniversary  मनाने के लिये !!!"  मी भलत्याच आगाऊ पणाने म्हणाले खरे .  पण  वाटलं , " होऊ शकत न असं  खरच कुणाला  नसेल मिळत एकांत , अशांसाठी ही  जागा एकदम वरदान आहे!".
      हा  हसला . आणि  म्हणाला ," मी फक्त ऐकलं होतं या जागेविषयी .  आज प्रत्यक्षात बघितलं . पण इथे धोका पण होऊ शकतो . कुणाकुणाच kidnaping , trafficing सारख्या वाईट गोष्टींसाठी सुद्धा ही  जागा प्रसिद्ध आहे ".   मग मात्र मी घाबरले . गंमतीच भूत पार  उतरून  गेलं .  एकदम भीती वाटू लागली.  कधी एकदा इथून बाहेर निघतोय असं  झालं . पण  भीती , गम्मत  आणि गारवा  यांचं मिश्रण  घेऊन आम्ही बोरीवली गाठलं .

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...