तू दिले गीत कळ्यांचे,
गंंध लेऊनी फुलायचेे.
गंंध लेऊनी फुलायचेे.
हिरव्या वेलीवरती नाजूक,
हिंदोळ्यावर डुलायचे.
तू दिले गीत घनांचे,
थेंब होऊनी उडायचे.
श्रावणातल्या सरीवर हळव्या,
इंद्रधनूतून बरसायचे.
तू दिले गीत निशेचे,
चांदणे बनुनी चमकायचे.
नक्षत्रांच्या रांगोळीतून वेधक,
नभांगण पुरे भऱायचे.
तू दिले गीत हृदयाचे,
श्वास होऊनी स्मरायचे.
आयुष्याच्या वाटेवर अवघड,
साथ होऊनी जगायचे.
5 comments:
chaan!!
Sundar!! Khupach chhan!!!
Chhan..liked it... ya kavayitri itake diwas aamhala adnyat hotya..
So you are an artist
So you are an artist
Post a Comment