Monday, December 14, 2015

I Am Startled


I am startled each time I look at you,
How god made you so marvellous,
It's you when I confront always and
Is You when every time I fondle,
There is  something I discover in you,
How god made you so marvellous.

Monday, November 30, 2015

ना होने देना

मुश्कील से मिली है किरन,
इस झरोके को ना बंद होने देना
वक्त के इस करिष्मे को ना बेकार होने देना |

पानी से भरा समंदर,
लेकिन इस झरने को गायब ना होने देना |
वक्त के इस करिष्मे को ना बेकार होने देना |

दिन  तो  बहुत  देखे है हमने,
आज कि मेहफिल को युंही संजोये रखना |
वक्त के इस करिष्मे को ना बेकार होने देना |

Monday, November 2, 2015

का वाट बघु तुझी

का वाट बघु तुझी,
अंधारलेली रात्र, 
थांबलीये तुझ्यासाठी.

का वाट बघु मी तुझी,
आखुडलेले हात,
तू नाही मिठीत घेण्यासाठी.

का वाट बघु तुझी, 
दारावर पडलेली थाप, 
तू नाही दार उघडू कुणासाठी.

का वाट बघु मी तुझी ,
गंधाळलेला धूप,
तू नाही मोहून जाण्यासाठी.

का वाट बघु तुझी,
दुमडलेलं  पान,
तू नाही कविता ऐकण्याठी.

Friday, October 30, 2015

पोतराज नाचताना

पाहतेय मी रोज त्यांना इथे कपडे बदलताना,
 रोजीरोटीसाठी स्वत:च चामडं सोलताना,
यांनाच म्हणतात संस्कृतीची विविधता,
भर उन्हात रणरणत्या अनवाणी चालताना.

बाई वाजवते बुगुगु डोई पदर हलेना,
हा नाद अन् त्याची पाऊले खळाळून एक होताना,
पाहते रोज त्यांना इथे कपडे बदलताना,
काळवंडल्या देहाने पोतराज नाचताना.

Wednesday, October 28, 2015

तू

दोन  दिवसांची ओळख
जीवाची मैत्री होईल का ?

वळवाचा पाऊस
हिरवे मळे पिकविल का ?

थरथरत्या पृथ्वीसाठी
तू अचल सुर्य होशील का ?

You - My Ageless Father!!

          In Pune university campus there is this baobab (Gorakh Chinch ) tree , huge and more than 120 year old which has been my fascination.


Underneath you,
on seeing you,
I remember the time
that had shaken my world.

Your big bark , embracing 
beyond the stretch of my hands,
It is the feeling, my ageless father
standing tall over the years.

So many monsoons
flooded my mind,
It was your roots
holding my ground.

Your silhouette, separating
the darkness of my sky,
It is the feeling, my ageless father
standing tall over the years.

Monday, October 26, 2015

सूर्य

निळ्या जांभळ्या नभात,
सूर्य एकटा दिसे.
नेमाने समर्थ पेलतो,
प्रकाशाचे देणे.

रोज उगवणे,
रोज अस्तणे.
चाकोरीचे जगणे,
करतो रोज नव्याने नवे.

रात्रंदिनी मीही जगते,
रोज पुन्हा बहरते.
सूर्याचे हे नव्याचे पूजन,
मीही लेऊन बघते.






Wednesday, October 14, 2015

वाट

तू राहा लांब,
घरापासून कितीतरी दूर,
तुझी वाट मात्र असेल
मला भेटायला आतुर..

Friday, August 21, 2015

गीत

तू दिले गीत कळ्यांचे,
गंंध लेऊनी फुलायचेे.
हिरव्या वेलीवरती नाजूक,
हिंदोळ्यावर डुलायचे.

तू दिले गीत घनांचे,
थेंब होऊनी उडायचे.
श्रावणातल्या सरीवर हळव्या,
इंद्रधनूतून बरसायचे.

तू दिले गीत निशेचे,
चांदणे बनुनी चमकायचे.
नक्षत्रांच्या रांगोळीतून वेधक,
नभांगण पुरे भऱायचे.

तू दिले गीत हृदयाचे,
श्वास होऊनी स्मरायचे.
आयुष्याच्या वाटेवर अवघड,
साथ होऊनी जगायचे.

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...