Thursday, August 1, 2013

अट्टहास

तुला दूर केल्यावर तू जवळ होता,
तू जवळ असताना दूर जाणं तेंव्हा कळलं.
तू जवळ असण्याचा अट्टहास,
अजूनही अट्टहास आहे,
कारण अजूनही मनात आस आहे.

अजूनही दोन रावे डोक्यावर
रुंजी घालून सांगतात,
तुझं माझ प्रेम कसं खास आहे,
अन् सारे भास आभास  आहेत.

वरवर पाहता खोली कळत नाही,
खोलात गेलं तर तळ लागत नाही.
खोली जरी लागली नाही,
तरी मनात मात्र समुद्र आहे.




Thursday, June 27, 2013

प्रगती

डोंगरांचे अडसर सरले,
घनदाट झाडीची भीती विरली,
काट्याकूट्याचे रस्ते नुरले,
सपाट डोंगर,सपाट झाडी,
सपाट रस्ते,सपाट सार्‍या मनुभावना,

चढणाची गती ना मंद,
ना उतारावर घसरगुंडी,
प्रगती झाली प्रगती झाली,
गतीची ती गती गेली,
आता उरली फक्त प्रगती.

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...