जसे पान पलटावे
आहे कालचीच गोष्ट
रखरख चोहिकडे
डोई तापती उन्हे
उभ्या अंगाची काहीली
तहानली पाखरे
शोधी पाणी कुणीकडे.
सृष्टी कालचीच सारी
परी रूप आज नवे
तापलेली उन्हे
आज लपली कुठे
धारा बरसती ढग
कृष्ण सावळे काळे
चोहीकडे पाणी सारे
हिरवाईही बहरे.
भारी खेळ बाई खेळे
देव ढगाच्याआडून
मन माझेही चंचल
काल भिरभिरे त्रस्त
कोण आनंद हा आज
म्हणे येतो आहे पाऊस.