Thursday, May 5, 2011

मीच..

क्षण क्षण सुटता
सापडे मीपण
निर्धार मनाचा
नच सुटणार

जगणे माझे
मरणही माझे
सरणही माझे
मीच रचणार

मन माझे
स्वैर जरी
लगाम त्याला
मीच घालणार.

मी ठरविली
दिशा माझी
क्षितिजही माझे
मीच मापणार.

कुणी बदलाव
आशा खोटी
एक खरं
मी बदलणार.

माझ्या पुरते
माझे जग
मीच
पुरे सावरणार

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...