Sunday, April 3, 2011
खर्ज . . .
हा खर्जातला आवाज मला का इतका लागतो ? खोलवर रूततो... काय आहे या आवाजात ? माझ्या भावनांचा अर्थ की भावनांना अर्थ ... असं वाटतं हा आवाज मला ओळखतो अगदी खूप चांगलं ... माझ्या प्रत्येक कृतीचा अर्थ माहिती ज्याला अगदी छोट्यातली छोटी.. मला कसलंही स्पष्टीकरण जिथं द्यावं लागणार नाही... त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे...आणि माझाही त्याच्यावर ...खुठे आहे तो खर्ज ... कुठे आहेस तू... मी वाट पाहतेय..
मी खरच वाट बघतेय तुझी चातकासारखी ... मला जगायचा आहे खूप भरभरून.. सगळे रंग बघायचे आहेत जगण्याचे.. गाणं नाचणं, खूप काम करणं .. मला माझी ताकत माहिती आहे मला माझ्यातलं चांगुलपणं माझ भारलेपणं बाहेर आणायचं आहे.. तुझी साथ मागतेय ... देशील ना ..
Subscribe to:
Comments (Atom)
आपण
नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून सगळ...
-
डोंगरांचे अडसर सरले, घनदाट झाडीची भीती विरली, काट्याकूट्याचे रस्ते नुरले, सपाट डोंगर,सपाट झाडी, सपाट रस्ते,सपाट सार्या मनुभावना, चढणाची गत...
-
नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून सगळ...
-
सारे क्षण आठवले सार्या आठवणी जाग्या जरी दूर आता दोघे पाश तरी ना तुटले म्हण ही प्रतारणा बोल जिव्हारी लागला शब्द मिळेना बोलण्या तरी...